Amit Thackeray नवी मुंबई : महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे आज नवी मुंबईच्या (Navi Mumbai) दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित ठाकरे शाखेच्या उद्घटनासाठी आले असता त्यांना असं कळलं कि, नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) स्मारकाचे अनावरण गेल्या अनेक महिन्यांपासून झालेलं नव्हतं. तसेच महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवली होती. हे बघताच अमित ठाकरेंनी स्व:त या पुतळ्याचे अनावरण केलं. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर पोलीस आणि मनसे सैनिकांमध्ये काही काळ झडप झाल्याचेही चित्र बघायला मिळेल. या कृत्यासाठी माझ्यावर कारवाई होते असेल तर हि माझ्या आयुष्यातील पहिली केस होणार आहे. मात्र वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेवू, असा पवित्र अमित ठाकरेंनी घेतला.

Continues below advertisement

Amit Thackeray : वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेवू

मी शाखा उद्घटनाच्या कार्यक्रमासाठी या भागात आलो होतो. दरम्यान मला असं कळलं कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा गेल्या चार महिन्यांपासून तयार होऊन आहे. त्यावर आता धूळ साचते आहे. हा पुतळा लोकांच्या मागणीवरून लोकांसाठी झाला आहे. मात्र सरकारमधल्या कुठल्याही नेत्याला अथवा मंत्र्याला महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करायला वेळ मिळत नसल्याचे दिसतंय. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून हे स्मारक धूळखात पडलं आहे. त्यावर धूळ जमतेय, मला ते बघवलं नाही. म्हणून मी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं. मला असं वाटतं माझ्यावर या बाबत कारवाई केली जाईल. मात्र या कारवाईचा मला आनंद आहे. माझ्या राजकीय जीवनातील जी कुठली पहिली केस असेल ती महाराजांसाठी असेल आणि त्याचा मला आनंद असेल. अशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी यावेळी बोलतांना दिली.

Continues below advertisement

Amit Thackeray : .....म्हणून आज आम्ही महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं

गेल्या चा महिन्यात अनेक नेते, मंत्री नवी मुंबईत आले आहेत. अगदी पंतप्रधान मोदी नवी मुंबईत विमान उद्घटनासाठी आलेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेलेत. दहिहांडी, पक्ष प्रेवशाच्या वेळी येऊन गेलेत. मात्र ज्यांना आपण आराध्य दैवत मानतो त्या छत्रपतींसाठी त्यांना वेळ मिळत नसेल तर हि दुर्दैवी गोष्ट आहे. मला हे बघवलं गेले नाही. महाराजांना कपडा बांधून ठेवल्याचे आम्हा मनसे सैनिकांना आणि नवी मुंबईरांना बघावलं नाही म्हणून आज आम्ही महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं, असेही अमित ठाकरे यावेळी म्हणाले.

संबंधित बातमी: