नाशिकमध्ये तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2017 07:40 AM (IST)
नाशिक : पंचवटीमध्ये एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या झाली आहे. दीपक अहिरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. काल रात्री 11.15 च्या सुमारास घटना घडली. काल मुख्य बाजार समितीच्या गेटवर अज्ञात इसमांनी दीपकवर धारदार शस्त्रांनी वार करुन त्याची हत्या केली. या हत्येनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. दीपकची हत्या करुन हल्लेखोर फरार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यातच आता ही हत्या झाल्याने, नाशिकमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढलं असल्याचं बोललं जात आहे.