नाशिक: कोपर्डीतील घटनेने घाबरून विद्यार्थीनींनी शिक्षण सोडू नये, यासाठी भय्यू महाराजांनी पुढाकार घेतला आहे. भय्यू महाराजांनी मुलींच्या सुरक्षित शालेय वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी घेतली आहे.


 

यासाठी अत्याधुनिक सुरक्षा सुविधायुक्त 4 स्कूल बसेस देणार असल्याचेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

 

कोपर्डी प्रकरणानंतर अहमदनगरमधील विद्यार्थीनींना शाळेत जाण्याचे प्रमाण कमी केले आहे. अनेक पालक आपल्या मुलीला शाळेत जाण्यासाठी अटकाव करत आहेत. त्यामुळे भय्यू महाराजांनी पुढाकार घेऊन विद्यार्थीनींच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी घेतली आहे. यासाठी त्यांनी चार बसेस देण्याचे अश्वासन दिले असून यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्ष स्थानी निर्भयाची आई असेल असे स्पष्ट केले.

 

बसची वैशिष्ट्य -

* महिला ड्राईव्हर आणि कंडक्टर

* बसमध्ये cctv, व्हिडीओ रेकॉर्डर, लोकेशन ट्रॅकर

* पिक-अप ड्रॉप करता यावे, यासाठी पालकांना अलर्ट मेसेज सिस्टम

* अटेंडेंट रेकॉर्डिंग, बायो मेट्रिक मशीन, लायब्ररी सुविधाही

अशा घटनांपासून घाबरून न मुलींना मानसिक बळ मिळावे, यासाठी सूर्यादय कुहू कन्याधन सुरक्षा योजना ही सुरु करण्यात येणार आहे.