नाशिक : भविष्यात युती करायची की नाही, हे शिवसेनाच ठरवेल, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपवर जोरदार टीका केली. तसेच, सत्तेसाठी नव्हे, हिंदुत्वासाठी युती केल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.   “छोट्या गोष्टींसाठी वाघांना बोलवण्याची गरज नाही.” यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, “भाजपला उत्तर देण्यासाठी मेळावा घेतला आहे का?” तर यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “छोट्या गोष्टींसाठी वाघांना बोलवण्याची गरज नाही.” अशाप्रकारे उद्धव यांनी भाजपवर निशाणा साधला. “मी सरकारच्या विरोधात नाही, जनतेच्या मनातलं बोलतो” असे सांगायलाही उद्धव विसरले नाहीत.   तमाम महाराष्ट्र तेव्हाच शिवसेनेच्या मागे उभा राहिला असता, तर आज चित्र वेगळं दिसलं असतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय, “भविष्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल” अशी खात्री उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात व्यक्त केली.   स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्तवाद आम्हाला मान्य असून, त्यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणीही उद्धव यांनी यावेळी केली.