नाशिक: ‘‘सामना’वर बंदी आणून दाखवा, मग पाहा काय करतो ते, सामना हे वृत्तपत्र नाही तर आमंच शस्त्र आहे. ‘सामना’ला नख लावला तर महाराष्ट्र पेटून उठेल. आम्ही नाकारलेले गुंड भाजपने घेतले. मंत्रालयाचे गुंडालय करणार आहात का?’’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील सभेत भाजपवर घणाघाती टीका केली.
‘शिवसेनेची वाट लावणारा अजून जन्माला यायचा आहे.’
शिवसेनेची वाट लावणारा अजून जन्माला यायचा आहे. केवळ मतं पाहिजे म्हणून ‘अच्छे दिन’च्या थापा आम्ही मारणार नाही. असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.
‘माझ्या मोबाइलमध्ये बाळासाहेबांसोबत अटलजींचीही भाषणं’
‘देशाला धमक्या देणारा पंतप्रधान हे दुर्दैव आहे.’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली. माझ्या मोबाइलमध्ये बाळासाहेबांसोबत अटलजींचीही भाषणं आहेत.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मतदारांनाही चुचकारलं.
‘शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ’
नोटबंदी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. नोटबंदी विरोधात मूठ आवळून दाखवा शिवसेनेच्या वचननाम्यात थापा नाही. देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. उत्तरप्रदेश सारखं इथल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्या. अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली.
‘शब्दाला किंमत असली पाहिजे’, फडणवीसांना टोला
‘‘माझा शब्द आहे!’ असं म्हणायला शब्दाला किंमत असली पाहिजे. तुम्हाला द्यायसाठी माझ्या हाती काही नाही. मुख्यमंत्र्यांचा हाती आहे ते देत नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली.
उद्धव यांचा मनसेला टोला
मनसेत गेलेले कंटाळून परत शिवसेनेत आले. काम करता येत नव्हते म्हणून शिवसेनेत आले. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसेवर बोचरी टीका केली.
‘मंत्रालयाचे गुंडालय करणार आहात का?’
‘भाजपला मेहबुबा मुफ्ती चालते, पण शिवसेना चालत नाही. आम्ही नाकारलेले गुंड भाजपने घेतले. मंत्रालयाचे गुंडालय करणार आहात का?’ अशीही उद्धव ठाकरेंनी टीका केली.
संबंधित बातम्या:
फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील : संजय राऊत
मनी लाँडरिंगचे आरोप उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचा डाव: शिवसेना
भुजबळ आणि उद्धव ठाकरेंचं एकाच कंपनीत मनी लाँडरिंग: सोमय्या
अमित शाहांची संपत्ती जाहीर, आता उद्धव ठाकरेंची करणार का? : माधव भांडारी
...म्हणून मला मुख्यमंत्र्यांची कीव येते: शिवसेना खासदार
निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार
'सामना'वर बंदीची मागणी ही लोकशाहीची हत्या : नवाब मलिक