नाशिक : राजकारणाऱ्यांवर वचक ठेवणारे नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंने आता आपला मोर्चा नियम मोडणाऱ्या नाशिककरांकडे वळला आहे. ओला आणि सुका कचऱ्याचं विलगीकरण न करणाऱ्यांवर मुंढेंनी दंडात्मक कारवाई केली आहे.


गेल्या तीन दिवसांत सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांकडून 3 लाखांचा दंड वसूल केला आहे. व्यावसायिकाडून 10 हजार, तर नागरिकांकडून 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात येतो आहे.

याशिवाय जे नागरीक घनकचरा विलगीकरण करणार नाहीत, त्यांचा कचरा 15 एप्रिलपासून स्वीकारला जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केलं आहे. तर प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर करऱ्यांकडून आतापर्यंत 32 हजाराचा दंड ठोठवण्यात आला आहे.