नाशकात मनसे, राष्ट्रवादीला धक्का, तीन नगरसेवक शिवसेनेत
एबीपी माझा वेब टीम | 18 Oct 2016 10:39 AM (IST)
नाशिक/मुंबई : नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे नगरसेवक अशोक सातभाई आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवाजी चुंबळे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नाशकातील राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले शिवाजी चुंबळे हे छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र नाशकात राष्ट्रवादीची साथ सोडून चुंबळे धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे चुंबळे यांची नगरसेविका पत्नी कल्पना चुंबळेही शिवसेनेत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे, नाशिकरोड भागातील मनसेचे नगरसेवक अशोक सातभाई हेसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश करणार आहेत.