नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून धमकी देण्यात आलीय. मनुस्मृतीला विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी देणारं पत्र छगन भुजबळांना पाठवण्यात आलंय. त्यामुळे नाशिकसह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मनुस्मृतीला विरोध केल्यास तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, अशी धमकी देणारं मजकूर असलेलं पत्र नाशिकमधील ‘भुजबल फार्म’वर पाठवण्यात आलंय. पत्र निनावी असल्याने नेमकं कुणी हे पत्र पाठवलं, ते कळू शकलेलं नाहीय.
नाशिकमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन, यासंदर्भात तक्रार नोंदवणार असल्याची माहिती मिळतेय. सध्या भुजबळ फार्मवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. या धमकी पत्राची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.
आम्हाला मनुस्मृती नकोय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हवंय, असे भुजबळ नागपुरात म्हणाले होते. तसेच, भुजबळांनी वेळोवेळी मनुस्मृतीचा निषेध नोंदवला आहे.
मनुस्मृतीला विरोध थांबवा, अन्यथा ठार करु, भुजबळांना धमकी
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
28 Oct 2018 01:35 PM (IST)
भुजबळ फार्मवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. या धमकी पत्राची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -