नाशिक : करवाढीच्या मुद्द्यावरुन नाशिकमध्ये सेना-भाजप आज आमने-सामने आले आहेत. करवाढीच्या प्रश्नावरुन आज नाशिक महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी शिवसेना नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्नही केला. मालमत्ता कर वाढवल्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे.


नाशिक महापालिकेनं कर वाढ केल्यामुळे भाजपविरोधात सर्व विरोधकांनी एकजूट दाखवत मालमत्ता करवाढीला जोरदार विरोध केला आहे. शिवसेना नगरसेवकांनी काळ्या टोप्या घालत मालमत्ता करवाढीचा जोरदार निषेध केला. तसंच सोनू तुला भाजपवर भरवसा नाही का हे गाणं म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही आंदोलन केलं आहे.

या सर्व गोंधळात नाशिक महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली आहे.