मुंबई : मी मराठा आरक्षणामध्ये (Maratha Reservation) घातलेला खुट्टा मनोज जरांगेंना (Manoj Jarange) उपटताच आला नाही, माझ्यामुळेच मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं नसल्याचं वक्तव्य साहित्यिक रावसाहेब कसबे (Ravasaheba Kasabe) यांनी केलं. मी मराठ्यांना विरोध केल्यानेच ओबीसींनी मराठ्यांना एकमताने विरोध केल्याचंही ते म्हणाले. नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) उपस्थित होते. 


रावसाहेब कसबे म्हणाले की, 2010 सालीही माझ्यामुळेच मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही. आता जरांगेंची दुसरी मोहीम सुरू झाली. जरांगे याने पहिल्याच भाषणात बोलताना म्हणाला होता की कसबेंनी घातलेला खुंटा मी उपटणार, पण जरांगेने काय केलं? 


काय म्हणाले रावसाहेब कसबे? 


2010 च्या दशकात ज्या वेळी ओबीसी आरक्षण पूर्ण धोक्यात आलं होतं, मराठे ओबीसी मध्ये जाणार होते. 2010 ला सेटिंग झाली होती, बहुमत झाले होते. छगन भुजबळांना हे सगळं माहीत आहे. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश होणार हे ठरलं होतं. त्यावेळी मी त्याला कडाडून विरोध केला. त्यावेळी  त्यानंतर एकमताने आम्ही मराठ्याना बाहेर काढलं. त्यानंतर जरागेची दुसरी मोहीम सुरू झाली. त्याच्या पहिल्याच भाषणात म्हणाला होता की, मराठा आरक्षणामध्ये रावसाहेब कसबेंनी घातलेला खुट्टा तो उपटणार. पण जरांगने काय केलं? 


'मराठा आरक्षणामध्ये घातलेला खुट्टा मी उपटणारच'


मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांचा समावेश ओबीसीमध्ये करून त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालंच पाहिजे अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी मोठं आंदोलन केलं. एका भाषणात बोलताना मनोज जरांगे यांनी 'मराठा आरक्षणामध्ये घातलेला खुट्टा मी उपटणारच' असं वक्तव्य केलं होतं. त्याला संदर्भ हा रावसाहेब कसबे यांच्या वक्तव्याचा होता. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण कधीच मिळणार नाही, मी मराठा आरक्षणामध्ये खुट्टा घातला आहे असं वक्तव्य रावसबाहेब कसबे यांनी केलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलं होतं. 


काय म्हणाले छगन भुजबळ? 


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेचा विषय ठरते आहे.'मी सध्या ओबीसीसाठी लढतो आहे, पण या लढ्यात फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होतंय, विकास बाजूला राहतो आणि जात बघितली जाते' असं भुजबळ यांनी म्हंटलय. रविवारी सायंकाळी नाशिकच्या औरंगाबादकर सभागृहात आयोजित माळी समाज सेवा समिती आयोजित फुलला माळ्यांचा मळा या डॉक्टर कैलास कमोद लिखित पुस्तकाचे प्रकाशन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाषणात बोलतांना 2014 साली नाशिक लोकसभा निवडणुकीत मी केलेली विकासकामे बाजूला राहिली आणि जात आडवी आली असं म्हणत 'ज्यांचे काहीच कर्तृत्व नाही ते जातीवर मतदान मागतात' असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे हेमंत गोडसेंना लगावला.


ही बातमी वाचा: