आयात गुंडांसह मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये पाठवणार: रामदास कदम
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2017 08:58 AM (IST)
नाशिक: मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपनं आयात केलेल्या गुंडांना तुरुंगात टाकेनं, असा धमकीवजा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला आहे. ते नाशिकमधील प्रचारसभेत बोलत होते. रामदास कदम म्हणाले की, ''शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर विधानसभेची निवडणूक लागू द्या, यानंतर निवडून येणाऱ्या मंत्रिमंडळात पुढचा गृहमंत्री मीच असेन. त्यानंतर भाजपनं आयात केलेल्या गुंडांसह मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवेन, अशी धमकी त्यांनी दिली. याशिवाय त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. मात्र नारायण राणेंवर टीका करताना रामदास कदम यांची जीभ घसरली.