ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 03 Mar 2017 12:47 PM (IST)
नाशिक: नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिन्समध्ये घोळ झाल्याचा आरोप करत आज नाशिकमध्येही आंदोलन करण्यात आलं. महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्वपक्षीय उमेदवारांनी हे आंदोलन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व उमेदवारांनी निदर्शनं केली. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या घोळाविरोधात आंदोलनं झाली आहेत. त्यामुळं ईव्हीएमप्रकरणी चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान, याआधी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत पुण्यातील पराभूत उमेदवारांनी चक्क ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा काढली होती. तसेच त्यावर प्रतिकात्मक अंत्यसंस्कारही करण्यात आले होते. राज्यातल्या अनेक भागात ईव्हीएम मशिन्ससंदर्भात तक्रारी येत आहेत. त्यामुळं खरंच ईव्हीएम मशिन्समध्ये काही घोटाळा झाला का याचीच चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. संबंधित बातम्या: