नाशिक : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. गोदावरी नदीच्या पाणीपात्रात देखील वाढ झली आहे. पुराचा पहिला इशारा देणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले असून, लक्ष्मणपूल, रामसेतूसह अनेक छोटे पूल आणि मंदिरं पाण्याखाली गेली आहेत.

पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये आज सकाळी 36 मिमी पावसाची नोंद झाली, तर जिल्ह्यात इगतपुरी-216, पेठ-119, त्र्यंबक-88 आणि सुरगाणामध्ये 73 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.

नाशिकमध्ये गोदामाईच्या पाणीपात्रात वाढ


दुसरीकडे, नाशिकमधील गंगापूर धरण 74 टक्के भरले आहे. गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच विसर्ग सुरु करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.