भुजबळ समर्थनार्थ मोर्चा लोकशाहीविरोधी, प्रशांत बंब विरोधात
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2016 05:20 PM (IST)
नाशिक/औरंगाबाद : गेल्या 6 महिन्यांपासून जेलची हवा खात असलेल्या भुजबळांच्या समर्थनासाठी 3 ऑक्टोबरला ओबीसी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मोर्चाच्या आयोजनाच्या बैठकीत अडीच हजारांहून अधिक भुजबळ समर्थकांनी हजेरी लावली. 5 हजारांपेक्षा अधिक वाहनं तसंच लाखो रुपयांचा निधी गोळा झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी या मोर्चाला उघडपणे विरोध केला आहे. हा मोर्चा लोकशाही विरोधी असल्याचं बंब यांनी म्हटलं आहे. उघडपणे भुजबळांच्या समर्थनासाठीच्या मोर्चाला भाजप आमदारानं विरोध केल्यानं भुजबळ समर्थक आक्रमक झाले आहेत. भुजबळांचं योगदान मोठं असून निव्वळ प्रसिद्धीसाठी बंब यांचा खटाटोप सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.