नाशिक: राष्ट्रीय हरित लवादाने नायलॉन मांजावर बंदी घातल्याने मांजा विक्रेत्यांविरोधात नाशिक पोलिसांनी छापासत्र सुरु केलं आहे. शहराच्या विविध भागातील 7 विक्रेत्यांकडून पोलिसांनी 25 हजार रूपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.

नाशिकमध्ये पतंगबाजीसाठी अजूनही नायलॉनच्या मांजाचा वापर होत असल्याचं दिसून येतं आहे. गेल्या 6 दिवसात 16 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून नायलॉन मांजा न वापरण्याचं आवाहन पोलिसांकड़ून करण्यात आलं आहे.

दरम्यान, डिसेंबरमध्ये नायलॉनच्या मांजा विक्रीवर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली होती. त्यातच सुप्रीम कोर्टानेही मांजावरील ही बंदी उठवण्यास आणि हरित लवादाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने, अनेक पतंग शौकिनांसोबतच मांजा विक्रेत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली आहे.

संबंधित बातम्या

मांजावरील बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार