नाशिक : लॉकडाऊनमुळे ठप्प झालेला येवल्यातील पैठणीचा व्यवसाय लॉकडाऊनच्या शिथीलतेनंतर पुर्वपदावर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येवल्यात यायला लोक धजावत नाहीय. अशातच येथील व्यवसायिकांना आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून पैठणीची खरेदी-विक्रीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.


येवला म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पैठणी. सातासमुद्रापार पोहचलेल्या येवल्यातील पैठणी खरेदीसाठी बाहेरगावच्या ग्राहकांची रोजच गर्दी होत असते. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले आणि पैठणीचा व्यवसाय ठप्प झाला. मुंबई, पुणे येथील ग्राहकांची शिर्डीच्या साई मंदीराला भेट दिल्यानंतर हमखास पैठणी खरेदीसाठी येवल्यात येत असतात. मात्र, अद्याप मंदिर, पर्यटनस्थळ बंद असल्याने येवल्यातील पैठणीच्या दुकांनांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे.


कोरोना काळात रुग्णांना गरज असताना नाशिक मनपा हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर धूळखात पडून


दुकानदारांना ऑनलाईनचा आधार


दुकानात येऊ न शकलेले ग्राहक सध्या विविध माध्यमातून ऑनलाईन पैठणीची खरेदी करत आहेत. या मागणीत गेल्या काही दिवसांपासून वाढ झालीय. त्यामुळे पैठणी विक्रेते ग्राहकाला हवी ती पैठणी कुरीअरच्या माध्यमातून घरपोहच पाठवत असले तरी प्रत्यक्षात ग्राहक दुकानात आल्यानंतर त्यांना जशी पैठणी खरेदी करायची इच्छा असते ती ऑनलाईनच्या माध्यमातून खरेदी करता येत नाही. तरी ठप्प असलेल्या या व्यवसायाला ऑनलाईनमुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे विक्रेते सांगतात.


ऑनलाईन विक्री.. आशेचा किरण


कोरोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. आता हळूहळू लॉकडाऊन उठवला जात आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे लोकं घराबाहेर पडायला धजावत नाही. परिणामी नियमांमध्ये शिथीलता देऊनही व्यवसायांना उभारी मिळणे कठीण होऊन बसलं आहे. अशात आता ऑनलाईन खरेदी, विक्रीमुळे व्यवसायांना आधार मिळत आहे. मात्र, प्रत्यक्ष खरेदीचा आनंद यात मिळत नसल्याचेही काहींचे म्हणणे आहे.


Nashik health services | नाशिक शहरातही आरोग्य व्यवस्था राम भरोसे!