नाशिक : नाशिक गुन्हे शाखा 1 च्या पथकाने नाशकातून दोन दिवसात सुमारे एक हजार किलोपेक्षा जास्त गांजा हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी 400 किलो गांजा गोठ्यातून जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे एमडी ड्रग्स पाठोपाठ गांजा खरेदी-विक्री करणारं रॅकेट नाशकात कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
गांजा घेऊन एक वाहन मंगळवारी नाशिकमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पंचवटीतील तपोवन परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका ट्रकवर संध्याकाळी कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी 34 लाख रुपयांचा 680 किलो गांजा जप्त करत यतीन शिंदे आणि सुनील शिंदे या दोघांना अटक केली होती. उदिशावरुन माल घेऊन हा ट्रक शहरात दाखल झाला होता.
या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच पोलिसांनी आज संध्याकाळी सिन्नर परिसरातील एका गोठ्यावर छापा टाकून जवळपास 400 किलो गांजा जप्त केला, तर एकाला ताब्यात घेतलं.
दोन दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा सापडल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकंदरीतच या गांजा रॅकेटचा पोलिस कसा पर्दाफाश करणार आणि यामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नाशकात दोन दिवसात एक हजार किलो गांजा जप्त
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
13 Jun 2018 09:19 PM (IST)
नाशकातून दोन दिवसात सुमारे एक हजार किलोपेक्षा जास्त गांजा हस्तगत करण्यात आला असून त्यापैकी 400 किलो गांजा गोठ्यातून जप्त करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -