नाशिक : नाशिकमधील गेम लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई, पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ‘व्हर्च्युअल गेम झोन’ सुरु झालं आहे. गेमिंगचा खराखुरा अनुभव इथे घेता येणार आहे.


हिरव्या रंगाचा एक स्टुडिओ, त्यामध्ये उभी राहून हातात रिमोट आणि डोळ्याला काळ्या रंगाचा बेल्ट लावत शरीराची काहीतरी हालचाल करणारी मुलं बघून नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही मुले नक्की काय करत आहेत, या विचारात पडली आहेत. हे दुसरं तिसरं काही नसून, ‘व्हर्च्युअल गेम झोन’ आहे.

मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ‘व्हर्च्युअल गेम झोन’ सुरु झाल्यने गेम गेम लव्हर्सच्या आनंदात आणखीच भर पडली आहे.

डोक्याला बॉक्स वजा बेल्ट हा हेडसेट बांधून, डोळ्यांसमोर लावताच तुम्ही गेमिंगच्या रिअल वर्ल्डमध्ये एंट्री होते. दोन्ही हातातील रिमोट ‘कंट्रोलर सेन्सर’ म्हणून काम करतात. स्टुडिओत लावलेल्या स्क्रीनवर ही मुलं नक्की काय खेळत आहेत, याचा आपल्याला अंदाज येऊन आपण देखील या व्हर्च्युअल गेमच्या प्रेमात पडतो..

नाशिकमध्ये शनिवारपासून गेम झोन सुरु करण्यात आले असून सध्या कार रेसिंग, फ्लाईट सिम्युलेटर, फ्रुट निन्जा, द वॉक, शूटिंग गेम, वॉर गेम आणि ओसियन व्हर्च्युअल हे 7 गेम्स इथे खेळले जात आहेत.

द वॉक गेममध्ये खोल दरी आणि त्यावरील एका अरुंद पुलावरून चालण्याचा एक थ्रिलिंग अनुभव घेता येतो. लहानपणी व्हिडिओ गेममधील रोड रॅश खेळताना पोलिसाला घाबरुन पुढे पळणारी मुले आता इथे कार रेसिंगमध्ये स्वतः कार चालवत तुफान स्पीडने पळवण्याची मजा लुटता येते. असे एक ना अनेक गेमचा थरार अनुभवता येतो.

एकंदरितच दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात रोज नवनवीन बदल होत असून त्यात आता फक्त मनोरंजनाचा भाग असलेल गेमिंग वर्ल्ड देखील मागे नाही. 2002 साली व्हडिओ गेम, 2010 साली प्ले स्टेशन आणि आता व्हर्च्युअल गेमिंगचा अर्थातच द रिअल एक्सपीरियन्स ऑफ गेम. गेमिंगच्या जगतातही अनेक बदल होताना दिसत आहेत.