नाशिक : नाशिक शहाराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी ज्या तुकाराम मुंढे यांच्यावर सोपविली आहे, त्यांच्याच विरोधात भाजप अविश्वास ठराव आणत आहे.
आज विशेष सभेचं आयोजन करण्यात आले आहे.
भाजप नगरसेवक तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठरवाचा प्रस्ताव आणून एकप्रकारे थेट मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नियुक्तीला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भाजपमधील एका गटाचा या अविश्वास ठरावाला विरोध आहे.
करवाढीचा मुद्दा पुढे करत मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन स्वाक्षरी मोहीम सुरु केल्याचे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे.
याआधी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असतानाही तुकाराम मुंढे यांना तेथील महापौरांसह नगरसेवकांचा विरोध पत्कारावा लागला होता, तेथून मग त्यांची नियुक्ती पुण्यातील पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी झाली. मात्र तिथे त्यांना विरोध झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागली. मात्र इथे सत्ताधारी भाजपनेच मुंढेंविरोधात आघाडी उघडली आहे.
नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
27 Aug 2018 11:21 AM (IST)
भाजप नगरसेवक तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठरवाचा प्रस्ताव आणून एकप्रकारे थेट मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नियुक्तीला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -