नाशिक : पूरस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील शेतकरी सध्या संकटात आहे. जिथं परिस्थिती बिकट आहे, तेथे दौरा करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. 


शरद पवार म्हणाले, "जवळपास एक महिना झाला राज्याला मंत्री नाही. राज्यात पूरपरिस्थिती  असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ टीम असणं आवश्यक आहे. लोक संकटात आहेत तिकडे विरोधी पक्ष नेते भेटी देत आहेत. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोध घ्यावा.  स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की, शेतकऱ्यांच्या भेटी घ्यायच्या हा विरोधाभास राज्यातील जनता पाहात आहे."  


शिंदे सरकार कोसळणार अशा सध्या राज्यात चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "सरकार पडेल निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत." 


"न्यायलयाने ओबीसी आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक आहे. मोठा वर्ग नाराज होईल, हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती या निर्णयामुळे निर्माण झाली आहे. जे प्रकल्प आमच्या सरकारने मंजूर केले, शिवाय टेंडर निघाले त्याला विलंब करणे किंवा रद्द करणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करायची की नाही हे नंतर बघू, आगोदर ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होऊ द्या. आमच्या घटक पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी अशी सध्या आमची भूमिका आहे, असे शरद पवार म्हणाले. 


दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला. "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना आपण सरकार चालवू असा आत्मविश्वास आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला. 


महत्वाच्या बातम्या


Exclusive : 'मुंबई ते सुरत एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, पण...' आमदार शहाजीबापू पाटील यांची स्फोटक मुलाखत  


Shahaji Patil : काय ती झाडी, काय तो व्हायरल कॉल; शहाजीबापूंना कॉल करणारे रफिक भाई म्हणाले..