नाशिक : नाशिकमध्ये अनैतिक प्रेम संबंधातून जळीतकांड घडलं. आरोपीने दोन महिलांसह एका चिमुकलीला पेटवलं असून यात नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली.
देव्हरे नावाच्या महिलेचं परिसरातीलच एका परप्रांतीय इसमासोबत प्रेमसंबंध होते. या महिलेची 19-20 वर्षांची मुलगी तिच्या नऊ महिन्यांच्या बाळासह इथे राहायला आली होती. परंतु किरकोळ भांडणातून महिलेचे आणि आरोपीचे भांडण झालं.
याच रागातून आरोपीने मध्यरात्री तिघींच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिलं. यात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आगीत भाजलेल्या महिलांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.