नाशिकमध्ये पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 26 Jul 2017 12:41 PM (IST)
पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.
प्रातिनिधिक फोटो
नाशिक : पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. महेंद्र गोसावी असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याने राहत्या घरी आत्महत्या केली. सातपूरच्या श्रमिकनगरमध्ये ही घटना घडली. पत्नी आणि सासूकडून वेळोवेळी होणारी पैशांची मागणी आणि सातत्याने धमकावलं जात असल्याने आत्महत्या करत असल्याचं महेंद्र गोवासी यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. "माझ्या आत्महत्येनंतर शरीर दान करावे, आई मला माफ कर," असा उल्लेखही सुसाईड नोटमध्ये केला आहे. दरम्यान, महेंद्र गोसावी यांच्या सुसाईड नोटवरुन सातपूर पोलिस तपास करत आहेत.