नाशिकमध्ये खासगी कंपनीत कामगारांची मॅनेजरला बेदम मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 16 May 2018 12:47 PM (IST)
मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नाशिक : कंपनीने नोटीस बजावली म्हणून कामगारांनी मॅनेजरला मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. नाशिकच्या सातपूर एमआयडीसीमधल्या डायनॅमिक प्रा. लि. कंपनीत ही घटना घडली. कामगारांनी मॅनेजर सचिन दळवी यांना रॉडने मारहाण केली. यात सचिन दळवी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी (15 मे) दुपारी ही घटना घडली. मात्र सचिन दळवी यांच्या तक्रारीनंतर दोन्ही कामगारांवर रात्री उशिरा सातपूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 323, 324, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सुरेश चव्हाण आणि आनंद सिंह या दोघांना अटक करण्यात आली. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओ