नाशकात मनसेला खिंडार, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2016 12:05 PM (IST)
मुंबई/नाशिक : नाशिकमध्ये मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेच्या चार, तर 'शेकाप'च्या एका नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. गणेश चव्हाण, सुवर्णा मटाले, विजय ओव्हळ, शीतल भांबरे या चार मनसे नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चौघांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे. शेकापचे माजी नगरसेवक जे. टी शिंदेही यावेळी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आतापर्यंत नाशिकमधील मनसेच्या 40 पैकी 25 नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. दुसरीकडे, दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे पदाधिकारीही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता आहे.