नाशिक: नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरु असल्याने, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी इथे अनोखं आंदोलन केलं.


तुंबलेल्या पाण्याला शिवसेनेने फडणवीस वॉटर पार्क असं नामकरण केलं.

इतकंच नाही तर पाण्यात पोहत शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांवर उपरोधिकपणे टीका केली. काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोरच्या त्र्यंबकेश्वर रोडवर पाणी साचलं आहे.

त्यामुळे शिवसैनिकांनी पाण्यात पोहत आंदोलन केलं. नाशिकला दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे फलकही आंदोलकांनी लावले आहेत.

गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळं नाशिकमधल्या रस्त्यांना नद्यांच स्वरुप आलं होतं. ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले, ड्रेनेज तुंबले होते. याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या युवा विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोरच्या त्र्यंबकरोडवर आंदोलन केलं.

इथं साचलेल्या पाण्यात शिवसैनिक मनसोक्त पोहले आणि भाजपावर उपरोधिकपणे टीका केली. नाशिकला दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन कऱणारा फलकही आंदोलकांनी हाती घेतला होता.