नाशकात शिवसेनेच्या नगरसेवकाला ऑनलाईन गंडा
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2016 07:04 PM (IST)
नाशिक : नाशकातील शिवसेनेच्या नगरसेवकाला ऑनलाईन गंडा बसला आहे. सिडको परिसरातील नगरसेवक अरविंद शेळके यांना चोरट्यांनी ऑनलाईन गंडा घातला आहे. गेल्या आठवड्यात पाथर्डी फाट्यावरील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून त्यांनी काही पैसे काढले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या बँकेतून 40 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. या प्रकरणी अधिक तपास केल्यावर हे पैसे गोव्यातून काढल्याचं उघड झालं. पाथर्डी फाट्यावरील याच एटीएममधून 8 ते 10 ग्राहकांनी पैसे काढल्यानंतर त्यांच्याही अकाऊंटमधील पैसे लुटल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. संबंधित एटीएम हॅक झालं असावं अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. तर पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.