ठाणे/नाशिक : मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण द्या या मागणीसाठी आज ठाण्यातील मुंब्रा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये मुस्लिमांनी मोर्चा काढला.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यातील मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाला मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणालाही पाठिंबा देण्यात आला.
नाशकातील मालेगावमध्येही मोर्चाचं आयोजन केलं होतं. सच्चक आयोगाच्या शिफारसी लागू करा, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा, जमिनीच्या मोबदल्यात मिळणारे पैसे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी खर्च करा अशा मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्यांवर फडणवीस सरकार काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्वाचं आहे.