नाशिक : नाशिकमध्ये एका विधवा महिलेला शौचालय बांधून देण्यासाठी चक्क जिल्हाधिकारी आणि सीईओंनी श्रमदान केलं. उच्च पदावर कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत हे काम केल्यानं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
त्र्यंबकेश्वरच्या तोरंगण गावात हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या मंदाबाई जाधव यांच्या घरात शौचालय नव्हतं. शौचालयासाठी परवानगी मिळाली, मात्र ते बांधून कोण देणार, हा प्रश्न उभा राहिला. मंदांबाईची हीच अडचण जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवली.
जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्यासोबत सीईओ मिलिंद शंभरकर कामाला लागले. त्यांनी शौचालयासाठी खड्डा खणला. एका सर्वसामान्य महिलेच्या मदतीसाठी खुद्द जिल्हाधिकारी कामाला लागल्यानं गावकरीही मदतीला आले आणि पाहता पाहता हे शौचालय बांधून तयारही झालं.