नाशिक: 'पायात बूट का घातले नाही?' असा सवाल विचारल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एटीएमच्या सुरक्षा रक्षकानं आपल्याच कंपनीच्या मॅनेजरला तुफान मारहाण केली आहे. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नाशिकच्या टाकळी रोडवर हेमंत बनकर हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. गोपारियाज मार्शल सिक्युरिटी एजन्सीनं त्यांना नोकरी दिली आहे. या कंपनीचे मॅनेजर हेमंत पाटील हे नाशिकचं काम बघतात.
सुरक्षा रक्षक हेमंतनं पायात बूट का घातले नाही? याबद्दल मॅनेजरनं जाब विचारला. याच रागातून सुरक्षारक्षक हेमंत बनकरनं आपल्या भावाला बोलावून मॅनेजर हेमंत पाटील यांना बेदम मारहाण केली आणि अपहरण केलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी हेमंत बनकर आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.