मुंबई : दररोज नाशिक-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलची हद्द आता नाशिकपर्यंत वाढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि चाकरमान्यांनाही आता लोकलची चाहूल लागली आहे.
नाशिक ते मुंबई दरम्यानचा सर्वात आव्हानात्मक पट्टा हा कसारा घाटाचा आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या लोकलची चाचणी कसारा घाटात केली जाणार आहे. त्यानंतर नाशिक-मुंबई लोकल सेवेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे या लोकलचे डबेही चेन्नईतल्या कारखान्यात बनवण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरु आहे. नुकतेच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि शिष्टमंडळाने चेन्नईत जाऊन या लोकलच्या कामाची पाहणी केली. ही लोकल 12 डब्यांची असून त्यात एकावेळी अठराशे प्रवाशांची बसण्याची क्षमता असेल.
मुंबई लोकल आता नाशिकपर्यंत, कसारा घाटातील चाचणीनंतर सेवेत
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
30 Jan 2019 09:01 PM (IST)
नाशिक ते मुंबई दरम्यानचा सर्वात आव्हानात्मक पट्टा हा कसारा घाटाचा आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या लोकलची चाचणी कसारा घाटात केली जाणार आहे. त्यानंतर नाशिक-मुंबई लोकल सेवेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -