नाशिकमध्ये महिंद्राची मराझो गाडी लाँच, किंमत आणि सुविधा काय?

एसयूव्ही सेगमेंटमधील ही नवी कार चार मॉडेलमध्ये आजपासून उपलब्ध झाली आहे. ही कार बनवताना आकर्षक रंग आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलं आहे

Continues below advertisement
नाशिक : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची नवी 'मराझो' गाडी नाशिकमध्ये लाँच करण्यात आली. एसयूव्ही सेगमेंटमधील ही नवी कार चार मॉडेलमध्ये आजपासून उपलब्ध झाली आहे. ही कार बनवताना आकर्षक रंग आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलं आहे. इतर गाड्यांच्या तुलनेत गाडी अधिक कंफर्ट असल्याचा कंपनीचा दावा आहे.
गाडीमध्ये अनेक नवीन फीचर्स लोड करण्यात आल्याचं महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा आणि एम डी पवन गोयंका यांनी सांगितलं. 9.99 लाख रुपयांपासून गाडी उपलब्ध असल्याने कमी बजेटमध्ये सर्व सुविधायुक्त मोठ्या कारचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
मराझो गाडी नाशिकमध्ये बनवली जाणार असल्याने नाशिकच्या उद्योग क्षेत्राला नवी उभारी मिळणार आहे. यानंतर दुसऱ्या गाडीचे नाशिकमध्ये मॅन्युफॅक्चरिंग नाशिकमध्ये केलं जाणार आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola