नाशिक : गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. आता त्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झाला आहे. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत. जीवनावश्यक सेवा वगळून शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरु राहणार आहे. सोबतचं शाळा, महाविद्यालय, जलतरण तलाव, व्यायाम शाळा बंद राहणार असल्याची घोषणा, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, जिल्हाबंदी करणे हा पर्याय आता योग्य नाही. धडधडित आपण सर्व बंद करणार नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले.
नाशिक जिल्ह्यात काय सुरु काय बंद?
नाशिकमध्ये लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला आहे का?
नाशिकमध्ये लॅाकडाऊन जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, एका महिन्यात चौपट वाढ झाली आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादण्यात आले आहे. जे नागरिक उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
नाशिकमध्ये कोणकोणते निर्बंध असतील?
शहरातील सर्व शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस बंद राहणार. दहावी, बारावी परीक्षा जवळ आल्याने त्यांनी कॉलेजला जाण्याबाबत ऐच्छिक निणर्य घ्यावा. नाशिक, नांदगांव, मालेगाव, निफाड मधील सर्व शाळा बंद. जीवनावश्यक सेवा वगळून शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरु राहणार. शहरातील सर्व आठवडे बाजार बंद.व्यायामशाळा, क्रिडा स्पर्धा यांना बंदी. सामाजिक, सार्वजनिक, धार्मिक सर्व समारंभ बंद राहणार. आर्थिक आणि आरोग्य या सगळ्यांचा विचार करून हे निर्णय घेण्यात आले आहेत.
हॅाटेल-रेस्टॅारंट/बार सुरु असतील का?
खाद्यगृह, बार हे सकाळी 7 ते संध्याकाळी 9 पर्यंत 50 टक्के क्षमतेनेचं सुरु ठेवता येणार आहे.
शाळा कॅालेज सुरु राहणार की बंद?
शहरातील सर्व शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस बंद राहणार. तर नाशिक, नांदगांव, मालेगाव, निफाड मधील सर्व शाळा बंद. दहावी, बारावी परीक्षा जवळ आल्याने त्यांनी कॉलेजला जाण्याबाबत ऐच्छिक निणर्य घ्यावा.
सार्वजनिक समारंभ तसंच लग्न किंवा मुंज यासारख्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी काय निर्देश आहेत?
15 मार्चनंतर लग्नसोहळे किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रम कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी होणार नाहीत.
जीवनावश्यक सामान/किराणा सामानाची दुकाने सुरु राहतील का?
जीवनावश्यक सेवा वगळून शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरु राहणार. शहरातील सर्व आठवडे बाजार बंद.
धार्मिक स्थळाचं काय?
नाशिक जिल्ह्यात आठवड्यात धार्मिक स्थळे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच खुली राहतील, शनिवारी आणि रविवारी सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार.