नाशिक : शहरातील प्रसिद्ध डॉक्टर, मॉडेलिंग क्षेत्रातील व्यक्तींचे व्हॉट्सअप हॅकिंगप्रकरणी आतापर्यंत 30 तक्रारी दाखल झाल्या आहे. या प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेनं राजस्थानमधून एक संशयित ताब्यात घेतलं आहे. नाशिकमधील अनेक उद्योजक, डॉक्टर आणि मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचे व्हॉट्सअप हॅक होत असल्याचा धक्कादायक बुधवारी समोर आला होता. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या दोन तक्रारींवरुन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पणनंतर याप्रकरणी व्हॉट्सअप हॅक होण्यासंदर्भात सायबर पोलिसांकडे जवळपास 20 तक्रारी झाल्या. विशेष म्हणजे या सर्व तक्रारी उद्योग, वैद्यकीय आणि मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी केल्या होत्या. यानंतर नाशिक गुन्हे शाखेने वेगाने तपास केला. यात राजस्थान मधील एक तरुण अशाप्रकारे व्हॉट्सअप हॅक करत असल्याचं समोर आलं. गुन्हे शाखेनेच्या टीमने तत्काळ राजस्थानमध्ये जाऊन संशयिताला ताब्यात घेतलं आहे. संबंधित बातम्या नाशिकमध्ये व्हॉट्सअॅप हॅकिंग, सायबर पोलिसांकडे आतापर्यंत 20 तक्रारी तुमचं व्हॉट्सअॅप सांभाळा, नाशकात हॅकर्सचा धुमाकूळ!