नाशिक : नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा बँकेची तक्रार करण्यात आली होती.

नाशिकमधील मुंबई नाका पोलिस स्टेशनला फसवणुकीप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले होते. नाशिक जिल्हा बँकेने महावितरणचे 33 कोटी 22 लाख रुपये बुडवल्याचा आरोप होता. नाशिक आणि मालेगावला फसवणूक केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक जिल्हा बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी आर. क्षिरसाठ आणि बी. कांकरिया या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.