नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या हेलिकॉप्टरचं आज (शनिवार) सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यानं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समजते आहे. मुख्यमंत्री आज (शनिवार) नाशिकहून औरंगाबादला जात असताना ही घटना घडली.
नाशिकला हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि काही सचिवही होते.
गेले काही दिवस मुख्यमंत्री सतत दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बरंच सामानही आहे. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये सामानाचं वजन अधिक झाल्यानं पायलटनं तात्काळ विमान हेलिपॅडवर उतरवलं.
त्यानंतर हेलिकॉप्टरमधून एका सचिवाला खाली उतरवण्यात आलं आणि विमान औरंगाबदच्या दिशेनं रवाना झालं.
दरम्यान, याआधी 25 मे 2017 रोजी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये खाली कोसळलं होतं. तर दुसऱ्यांदा रायगडमध्येही फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यानं मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या चॉपरचे आतापर्यंतचे अपघात
लातूर - 25 मे 2017
लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंकतर काही क्षणातच कोसळलं.
अलिबाग - 7 जुलै 2017
हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकल्यानं मागील पाते मुख्यमंत्र्यांचा डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला
नाशिक - 9 डिसेंबर 2017
हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेला पायलटच जबाबदार : एएआयबी
जो महाराष्ट्राचं भलं करतो, त्याला काहीही होणार नाही : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री
हेलिकॉप्टर उडालं, 1 मिनिटात कोसळलं, नेमकं काय घडलं?
लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं
मुख्यमंत्र्यांचं कोसळलेलं हेलिकॉप्टर कोणत्या बनावटीचं?
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Dec 2017 11:59 AM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या हेलिकॉप्टरचं आज (शनिवार) सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -