नाशिक : शेतकऱ्यांना शेतमालाचा मोबदला देण्यास दिरंगाई करणाऱ्या पाच बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस देण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना ही नोटीस बजावली.
या नोटीसला 11 मेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनमाड, देवळा, उमराणे, येवला, मालेगाव या बाजार समित्यांचा यामध्ये समावेश आहे.
गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांना बाजार समिती आवारातच लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. चेक बाउन्स होणे, शेती मालाचा मोबदला न मिळणे या तक्रारी वाढल्याने प्रशासनाने हे पाऊल उचललं.
नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Apr 2018 11:49 AM (IST)
जिल्हा उपनिबंधकांनी नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना ही नोटीस बजावली. या नोटीसला 11 मेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -