नाशिक : खाजगी शाळांमधील फीवाढीबाबतीत शालेय शिक्षण मंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतरही शाळांची मुजोरी कायम आहेत. नाशिकमधील केम्ब्रिज शाळेनं दहावीतील 7 विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढलं आहे.
नाशिकच्या इंदिरानगर परिसरात असलेल्या केम्ब्रिज शाळेनं वाढीव फी न भरणाऱ्या 7 विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. फी वाढीविरोधातील निर्णय लागेपर्यंत मुलांना शाळेत प्रवेश द्यावा, असे महापालिकेच्या शिक्षण विभागाने लेखी पत्र देऊनही शाळेची मुजोरी कायम आहे. मनपा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास शाळा प्रशासनाचा नकार दिला आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. शाळेविरोधात पालकांनी इंदिरा नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.