नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकांच्या उमेदवारीसाठी दोन लाख रुपयांची मागणी करण्याचं कथित प्रकरण भाजपला महागात पडण्याची चिन्हं आहेत. निवडणूक आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप शहराध्यक्षांकडून खुलासा मागवला आहे.


भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना यासंदर्भात तात्काळ खुलासा देण्याचे निर्देश आचारसंहिता कक्षाने दिले आहेत. त्याचवेळी या व्हिडिओतील सत्यता तपासण्याची जबाबदारीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

10 लाख देऊनही तिकीट नाही, भाजप इच्छुकाचा दुसरा व्हिडिओ?


काही दिवसांपूर्वी इच्छुकांकडून उमेदवारीसाठी दोन लाख रुपयांची मागणी करणारा भाजपचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता कक्षानं भाजपला आपलं म्हणणं मांडायला सांगितलं.

VIDEO : नाशिकमध्ये भाजपकडून एबी फॉर्मसाठी 2 लाख रुपयांची मागणी


शहराध्यक्षांचा खुलासा आणि व्हिडिओबाबतचा अहवाल यांच्या अभ्यास करुन आचारसंहिता भंग झाला की नाही हे निश्चित केलं जाणार आहे. मात्र तोपर्यंत नाशिक भाजपच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार कायम असेल.

काय आहे प्रकरण?


नाशिकमधल्या भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात तिकीट वाटपादरम्यान उमेदवारांकडून दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भाजपचे पदाधिकारी नाना शिलेदार आणि अरूण शेंदुर्णीकर एका उमेदवारांकडून दोन लाखांची मागणी करताना व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहेत.

प्रचार खर्चासाठी दोन लाखांची मागणी करण्यात आल्याचं स्पष्टीकरण भाजप नेत्यांकडून देण्यात आलं. नाशिकमध्ये भाजप मध्यवर्ती कार्यालयातली ही व्हिडीओ क्लीप आहे. एबीपी माझा व्हिडीओची सत्यता पडताळत असून व्हिडीओ बनवणारी व्यक्ती अद्याप पुढे आली नाही.

दुसऱ्या व्हिडिओत भाजप नेते गोपाळ पाटील यांनी तिकीट कापल्यानंतर 10 लाख देऊनही तिकीट न दिल्याची नाराजी व्यक्त केली आहे.मात्र हे विधान ज्याला तिकीट मिळालं, त्या प्रतिस्पर्धी इच्छुकाचं असून, मनसेनं हे कुभांड रचल्याचा आरोप केला जात आहे. जे वाक्य माझ्या मुखात नाही, ते घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा इच्छुकाने केला आहे.

पाहा व्हिडिओ :