नाशिक : हातात फुलं, पुजेचं ताट आणि मुखात गोडवा असणाऱ्या पुजांऱ्याच्या तोंडात चक्क शिविगाळ आणि हातात बंदुका असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात धार्मिक विधी, पौरोहित्य करणारे काही परप्रांतीय पुरोहित आहेत. दरम्यान नागपूरमधील एका भाविकांची कालसर्पशांती पूजा करण्यावरून या पुरोहितांच्या दोन गटात वाद झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी एका गटाने 11 हजार रुपये दक्षिणा सांगितली तर दुसऱ्यानं कमी पैशात पूजा करून देण्याचा दावा केला. यातून दोन्ही गटात बाचाबाची झाली. दोन्ही गट नाशिकच्या पंचवटी परिसरात वास्तव्यात असल्यानं रात्री नाशिकच्या हिरावडी परिसरात पुन्हा वादावादी सुरू होऊन दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी पुजाऱ्यांनी एकमेंकावर लाठ्या, धारधार शस्त्र, हॉकीस्टिक, कोयता इतकचं नाहीतर गावठी कट्टेही एकमेंकावर ताणले. त्यानंतर पंचवटी पोलिसांनी संबधित 7 जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
पवित्र त्र्यंबकेश्वरमध्ये धक्कादायक प्रकार
त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातून दररोज हजारो भाविक दाखल होत असतात. बहुतांश भाविक कालसर्प शांती, नारायण नागबली, त्रिपिंडी पूजा करतात. या माध्यमातून दिवसागणिक 20 ते 25 लाख रुपयांची उलाढाल याठिकाणी होत असते. कालसर्प शांतीला 2100 ते 3000 , नारायण नागबली पुजेला 5 ते 8 हजार आणि त्रिपिंडीसाठी 3 हजारापर्यंत खर्च येतो मात्र परप्रांतीय पुरोहित याच पूजेसाठी तिप्पट चौपट दर लावत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या आधीही परप्रांतीय पुजांऱ्यांकडून गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांत गुन्हे देखील दाखल आहेत, मात्र आता धारधार शस्त्र, गावठी कट्टे सापडत असल्याने त्रंबकेश्वरची बदनामी तर होतच आहे. शिवाय भीतीचं वातावरण पसरल्याची खंत व्यक्त होतं आहे.
हे ही वाचा
- भाजपच्या उपमहापौरांवर उपायुक्तांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा, शिवीगाळ केल्याचाही आरोप
- महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावरील चित्रपटाला 19 वर्षांनंतरही विलंब, राज्य सरकार निर्मीत चित्रपटात अनियमितता आणि भ्रष्टाचार?
- Nawab Malik : आधी वडील, नंतर भाऊ आणि आता आत्या..., वानखेडेंच्या आत्यांनी केली नवाब मलिकांवर अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha