नाशिक : नाशिकमध्ये स्वाईन फ्लूनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात 6 जणांचा मृत्यू झालाय. तर 20 रुग्ण संशयित असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळं जिल्हा प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
नाशिक मध्ये स्वाईन फ्लू ने चांगलच डोकं वर काढलय, स्वाईन फ्लू संशयित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील दीड महिन्यांमध्ये स्वाईन फ्लूमुळं एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 रुग्ण हे संशयित असून त्यांच्यावर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या टॅमी फ्लूच्या 16 हजार टॅबलेट्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर उशीरा जाग आलेल्या शासकीय यंत्रणेने आता शासकीय रुग्णालयात आणि महापालिकेच्याही रुग्णालयात स्वाईन फ्लूसाठी स्वतंत्र कक्ष तयार केलं आहे.
दरम्यान, स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिककरांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.