नाशिकजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर बस पलटी, 30 जण जखमी
एबीपी माझा वेब टीम | 08 Mar 2019 12:34 PM (IST)
मालेगाव बस डेपोवरुन सकाळी नाशिकच्या दिशेने ही बस रवाना झाली होती. त्यादरम्यान मालेगावकडून भरधाव नाशिककडे भरधावात असलेल्या या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले. गाडीत बसलेल्या एका प्रवाशाने प्रसंगावधान ओळखून वेगात असलेली बस थांबवण्याचा प्रयत्न केला.
मनमाड : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या रेणूका माता मंदीर घाटमाथ्याजवळ सकाळी आठ वाजेच्या सुमारास मालेगाव-नाशिक एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले असून कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. मालेगाव बस डेपोवरुन सकाळी नाशिकच्या दिशेने ही बस रवाना झाली होती. त्यादरम्यान मालेगावकडून भरधाव नाशिककडे भरधावात असलेल्या या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले. गाडीत बसलेल्या एका प्रवाशाने प्रसंगावधान ओळखून वेगात असलेली बस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र बस पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्याने पलटी झाली. या अपघातात बसमधील 25 विद्यार्थी आणि पाच प्रवाशी जखमी झाले. घटनास्थळी तातडीने पोलीस आणि सोमा टोल कंपनीच्या रुग्णवाहिका पोहचल्या आणि जखमींना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सकाळच्या वेळेत शाळा महाविद्यालयाला जाण्यासाठी बसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे बसच्या अपघातात तब्बल 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींवर चांदवड शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.