पतंगामागे धावताना 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2017 06:04 PM (IST)
नाशिक: पंतग उडवणं आणि कटलेली पतंग पकडणं याची काही जणांना फारच हौस असते. अनकेदा तर पतंग पकडण्यासाठी अनेक जण जीवाचा आटापिटाही करतात. मात्र, पतंगामागे धावताना काळजी घेतली नाही तर जीव देखील गमावावा लागू शकतो. पंतगामागे धावताना तोल जाऊन विहिरीत पडल्यामुळं नाशिकच्या 21 वर्षीय तरुणीचा आपला जीव गमवाला लागला आहे. मनिषा पवार असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली असून, मनिषाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, याआधीही पंतगाच्या मांज्यामुळे अनेकांना दुखापत झाल्या आहेत.