नाशिक : हरभऱ्याचा दाणा श्वास नलिकेत अडकल्यामुळे एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

नाशिकच्या राणा प्रताप चौक परिसरात राहणाऱ्या सुजय जिबुटकरने या चिमुकल्याने आज (शुक्रवार) सकाळी सव्वा नऊ वाजता खेळता खेळता तोंडात हरभरा घातला. पण तो थेट त्याच्या श्वासनलिकेत जाऊन अडकला. त्यामुळे अचानक त्याचा श्वास गुदमरला आणि यातच सुजयचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोनच दिवसापूर्वी सुजयचा पहिलाच वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पण आजच्या घटनेनं संपूर्ण जिबुटकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहा रुपयाचं नाणं गिळल्यानं साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.


संबंधित बातम्या :


10 रुपयाचं नाणं गिळल्याने साडेचार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू