Dada Bhuse on Maha patrakar parishad नाशिक : अध्यक्षांनी जो न्यायनिवाडा केला, त्यात कायदे, नियम आणि वस्तुस्थितीवर न्यायनिवाडा केला. जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांचे रोज केविलवाणे प्रयत्न सुरू असतात, असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उद्धव ठाकरेंना महा पत्रकार परिषदेवरून (Maha Patrakar Parishad) लगावला. 

Continues below advertisement


सोमवारी नाशिकला 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) समारोपाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दादा भुसे बोलत होते. ते म्हणाले की, न्यायनिवाड्याला दोन बाजू असू शकतात. ज्याला मान्य नाही, त्याला दाद मागण्याचा अधिकार आहे. परंतु जनतेत संभ्रम करणे आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. 


उद्या सर्वोच्च न्यायालयावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणार का?


तुम्ही उद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेले आणि त्यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणार का? असा सवाल दादा भुसे यांनी उपस्थित केला. या अगोदरही उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, हे उचित नसल्याचेदेखील ते म्हणाले. 


पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यांकडे लक्ष


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्ज माफ होतात. पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही. देशात चुकीची आर्थिक धोरण राबवली जात आहेत, अशी टीका केली. यावर दादा भुसे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अशा अनेक योजना राबवण्यात येत आहे.  


विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली


मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर गेले आहेत. या वरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावर दादा भुसे यांनी विचारले असता ते म्हणाले की, विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला आहे. महाराष्ट्रात विकास कामांचे जे प्रकल्प आहे, ते बघून जागतिक पातळीवरील गुंतवणूक होईल. दावोस वरून आल्यानंतर किती हजारो कोटींचे करार संपन्न झाले, याची माहिती मुख्यमंत्री देतील. त्याअगोदरच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपल्या राज्याचे नाव कमी होईल, यासाठी हे लोक खालच्या पातळीवर आले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. 


यांच्या बुद्धीची कीव वाटते


जितेंद्र आव्हाड यांनी राम कोणत्या जातीचे होते, ते बहुजन होते की नाही. तसेच मटन म्हणजे काय. यावर पुन्हा एकदा भाष्य केले. यावर दादा भुसे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, मतांच्या लाचारीसाठी माणूस किती खालच्या पातळीवर जातो. यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. यांची फक्त सुंता बाकी राहलीय, अशी टीका त्यांनी केली. 


आणखी वाचा 


उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, आता मोदींनी पत्रकार परिषद घेण्याची हिम्मत दाखवावी :संजय राऊत