sanjay Raut नाशिक : काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) येवून साफसफाई करता, हे ढोंग काय करतात? राम मंदिर झाल्याने सर्व आनंदी होते, हा माणूस रडतो. निवडणूक आली की हा माणूस रडतो, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना नाशिकमध्ये लगावला आहे. 


आजची विराट सभा आहे. अयोध्येतून प्रभू श्रीराम आपल्याला आशीर्वाद देत आहेत. प्रभू श्रीराम हे सत्य वचन होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलताय. नाशिकला येऊन मोदी कांदा प्रश्न सोडवतील असे म्हटले,पण शेतकऱ्यांचा प्रश्न काही सोडवला नाही. पुलवामा झाले तेव्हा मोदी रडले नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तेव्हा मोदी रडले नाही. घरोघरी अक्षता वाटत आहेत, आहो अक्षता कसल्या वाटतात, आमचे 15 लाख रुपये द्या, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. 


फेकनाथ मिंधेंना नाशिकमध्ये आलो तर मिरच्या झोंबल्या


संजय राऊत पुढे म्हणाले की, परवा मोदी आले शेतकऱ्यांना अटक केली, असे जुलमी राज्य उलथवून टाका. उद्धव ठाकरे यांना राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व द्यायचे आहेत. शिवसेना एकच आहे ती बाळासाहेब यांची आहे. शिवसेना मिंध्यांची नाही. फेकनाथ मिंधेंना आपण नाशिकमध्ये आलो तर मिरच्या झोंबल्या. आता मिरच्या झोंबल्या ठेचा अजून आता जायचा आहे. 


गद्दारांना 50 फूट खाली गाडा


सरकारमध्ये असताना तुम्ही जे चरत होतात, ते खोके पक्ष निधी म्हणून शिवसेनेच्या तिजोरीत जमा करा. 50 खोके एकदम ओके,  या गद्दारांना 50 फूट खाली गाडा म्हणजे कोणी गद्दारी करणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी शिंदे गटाला लगावला. 


भास्कर जाधवांचा हल्लाबोल 


रश्मी वाहिनी आज जशा बसल्या आहेत. अशाच मा साहेब बसायच्या, उद्धव ठाकरेंवर मोठी शस्त्रक्रिया झाली. आदित्य ठाकरेंवर अनेक आरोप झाले. तेव्हा देखील वहिनी भक्कमपणे उभ्या होत्या. वाहिनी तुम्ही आता बाहेर पडले पाहिजे, असे अनेक महिलांचे म्हणणे आहे. वाहिनी विश्वासघात झालाय, गद्दारी केलीये. त्यांना आता गाडल्याशिवाय राहायचे नाही, अशी जहरी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. 


आणखी वाचा 


Nashik News : "मराठी माणसाच्या अस्मितेसाठी लढणार", ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनात 'हे' ठराव एकमताने मंजूर


Sanjay Raut : "शिवसेना नसती तर अयोध्येत काल रामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती"; नाशकात संजय राऊत कडाडले