शिर्डी : आज महाराष्ट्र अडचणीत आहे. राज्या समोर सर्वात मोठी अडचण असणार आहे ते म्हणजे पाण्याची. त्यामुळे आपण पाण्यासाठी प्रयत्न करायचेत. अंगणवाडी सेविकांना शब्द देते की, आमचं सरकार आलं की पहिली सही अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाच्या फाईलवर करेन, असं म्हणत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणादरम्यान सुप्रिया सुळे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. 


मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणाचा मुद्दा जो सोडवेल त्याच्या पाठिशी आम्ही ताकदीने उभे राहू. देवेंद्र फडणवीस आमच्या घराबाहेर येऊन बोलत होते की, आम्ही आरक्षण देऊ, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोलाही लगावला. जो गरीब आहे त्याच्या विरोधात नाही, तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीविरोधात मी लढेन, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगवला. 


नातं तोडणं सोपं असतं निभावणं कठिण 


सुप्रिया सुळे, अजित पवार यांना सॉफ्ट लँडिंग होतं. पण शरद पवारांना ते कधीचं नव्हतं. ते स्वत:च्या हिंमतीवर मुख्यमंत्री झाले. मी पक्षाकडे आजपर्यंत काहीह मागितलं नाही केवळ खासदारकीचं तिकीट मागितलं.  यशवंतराव चव्हाण यांचं नाव पुढे घेऊन मी जाईन. समोरच्य लोकांना तो अधिकार नाही. केवळ एक दिवस जाऊन फुले वाहण्यात काही अर्थ नसतो. नातं तोडण सोप्प असतं ते निभावता येणं जमायला हवं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोला लगावला. 


त्या आमदारांना लाज वाटलायला हवी


50 खोक्यावर जर आमदार विकला जात असेल तर त्या आमदाराला लाज वाटालयला हवी. मी आमदारकी लढणार नाही.माझा नवरा कॉन्ट्रॅक्टर नाही त्यामुळं मला भिती वाटत नाही. माझ्या वडिलांची लढाई नाही ही महाराष्ट्राचा स्वाभिमानाची लढाई आहे.आमच्यात वाद लावून तुम्ही निवूडन येणारं हे चालणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 


संपूर्ण राज्यात तालुकानिहाय फिरणार


सगळी बक्षिसं कशी मिळतात कारण आम्ही सभागृहात बसतो.मी उच्च शिक्षित आहे, करायची असती तर नोकरी केली असती. शनिवार रविवार सुट्टी घेतली असती. पण माझ्यावर ते संस्कार झालेत, घरातील कर्त्या पुरुषाच्या पाठी उभं राहायचं. काहीजण याचा गैरफायदा घेतात. लोकसभा निवडणूक लढवणारच त्यानंतर चार महिने संपूर्ण राज्यात तालुका निहाय दौरा करणार असल्याची घोषणा देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी केलीये. 


हेही वाचा : 


Sharad Pawar Speech : अनेक राज्यात भाजप बळकट नाही, तरी 450 जागा येणार कशावर म्हणतात? पवारांचा सवाल