Nashik Nandgaon Nagarparishad Election 2025 नाशिक: नाशिकच्या नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत (Nashik Nandgaon Nagarparishad Election 2025) प्रभाग क्रमांक आठ 'ब'मधून शिवसेना शिंदे गटाच्या खान जुबेदाबी गफार यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीने नांदगाव नगरपरिषदेत शिवसेनेचा (शिंदे गट ) पहिला उमेदवार बिनविरोध ठरला आणि विजयी झाला.

Continues below advertisement

नांदगाव नगरपरिषदेच्या (Nandgaon Nagarparishad Election 2025) थेट नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, अरुण पाटील, माजी नगरसेवक किरण देवरे, सागर हिरे आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेश बनकर यांना उमेदवारी देत शिवसेना शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना उबाठा गटाकडून संतोष गुप्ता यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने थेट नगराध्यक्ष पदासाठी मुख्यतः तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत झाल्यास माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश बनकर यांच्यातच मुख्य लढत होईल. राजेश कवडे सलग दोन टर्म नगराध्यक्ष राहिले आहेत, राजेश बनकरदेखील भारतीय जनता पक्षाकडून थेट नगराध्यक्षपदी निवडून येऊन नगराध्यक्ष राहिलेले आहेत.

246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान- (Nagarparishad Nagarpanchayat Election 2025)

मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. आजपासून अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज छाननी नंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असून 19 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. तर 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. 

Continues below advertisement

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: