Uddhav Thackeray: नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन

बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनानिमित्त ठाकरे गटाचं नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jan 2024 08:17 PM

पार्श्वभूमी

Uddhav Thackeray Sabha  Live Updates: आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 10 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या...More

Uddhav Thackeray : निवडणुकांमुळे मोदींना महाराष्ट्राची आठवण; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. मोदींचे दौरे वाढले आहेत. जेव्हा महाराष्ट्र संकटात होता तेव्हा मोदी आले नाही. निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्र आठवतोय. मणिपूरला लोकसभेच्या दोन जागा म्हणून तिकडे गेले नाहीत. इकडे 48 जागा म्हणून येतात. महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे  नुकसान झाले. तेव्हा राज्य सरकारने मागणी करून ही निधी दिला नाही. पण, गुजरातला न मागताही निधी दिला. हिंदूमध्ये विष पेरतात. भेदभाव करतात. देशासाठी 'मन की बात' गुजरातसाठी 'धन की बात' करता अशा शब्दात ठाकरे यांनी हल्लाबोल केला.