Shirdi Saibaba Sansthan: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत (Shirdi Saibaba Sansthan) दररोज हजारो भाविक हजेरी लावतात. यात अनेकदा पदाधिकाऱ्यांचे शिफारस पत्र घेऊन येणारे तसेच शासकीय विभागातील अनेक अधिकाऱ्यांचा अथवा त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असतो. दिवसभरात अनेकदा शिफारस पत्र घेऊन येणाऱ्या व्हीआयपी दर्शनासाठी दर्शन रांगेत अडथळा येतो. मात्र आता सर्वसामान्य भाविकांना सुकर दर्शन व्हावं या उद्देशाने साईबाबा संस्थान दर्शन ब्रेक नियमावली लागू केली आहे.
शिफारस पत्र घेऊन येणाऱ्या व्हीआयपी भाविकांसाठी दिवसभरात अडीच तास राखीव ठेवण्यात आले आहे. या राखीव वेळेतच त्यांना पाच घेऊन दर्शन मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांची दर्शना बिना अडथळा दिवसभर सुरू राहील. अतिमहत्त्वाच्या व मोठे दान देणाऱ्या साई भक्तांना मात्र या नियमातून सूट देण्यात आली आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी नवीन नियमाबाबत अधिक माहिती दिली.
ब्रेक दर्शनमधून पुढील व्यक्तींना सूट -
- अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि मोठ्या देणगीदारांना वेळेचे बंधन नसेल त्यांची दर्शनाची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच असेल.
- राजकीय आणि न्यायिक पदाधिकारी: भारताचे आजी-माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष/उपाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मंत्री, विधानसभा/ विधान परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, आमदार, खासदार आणि विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश.
- प्रसिद्ध उद्योगपती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सिनेअभिनेते, शास्त्रज्ञ आणि संस्थानच्या व्यवस्थापन/तदर्थ समितीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य. एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणारे साईभक्त...(यांचा अतिमहत्त्वाच्या यादीत समावेश असून यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.)
- शिफारस पत्र घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन वेळ व्यवस्था- (यावेळे व्यतिरिक्त आल्यास कोणताही प्रोटोकॉल मिळणार नाही)
अशा आहेत ब्रेक दर्शन व्यवस्थेच्या वेळा-
सकाळी 9:00 ते 10:00 (एक तास)
दुपारी 2:30 ते 3:30 (एक तास)
रात्री 8:00 ते 8:30 (अर्धा तास)
यावेळेत शिफारस घेऊन घेणाऱ्या VIP भक्तांना पेड पास घेऊन दर्शन मिळेल.