नाशिक : मंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर शिवसेना खासदार संजय खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज मालेगाव न्यायालयात हजर राहण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी दादा भूसेंवर पुन्हा तोफ डागली. संजय राऊतने कधी माफी मागितली नाही. दादा भुसेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. संजय राऊत यांनी मालेगाव दौऱ्यात शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. 


राजकीय सुडाने कारवाई केली जात आहे


संजय राऊत (Sanjay Raut on Dada Bhuse) म्हणाले की, आमचा मालेगावचा एक लढवय्या नेता तुरंगात आहे. मी याठिकाणी आहे. राजकीय सुडाने कारवाई केली जात आहे. गिरणा सहकारी कारखाना (Girna Sugar factory) संदर्भात दादा भुसे यांनी 178 कोटी रुपये जमवले आहेत, त्याचा हिशेब द्या. हा हिशोब मागतो तर आम्ही गुन्हेगार झालो आहोत. आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.



संजय राऊतने कधी माफी मागितली नाही


मी घाबरत नाही, पाय लावून पळत नाही डरपोक आहोत का? तुमच्यासारखं नाही, नोटीस आली की गेले दुसऱ्या कोर्टात. संजय राऊतने कधी माफी मागितली नाही, सत्य सत्य आहे तर माफी का? दादा भुसे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. 2024 नंतर सर्व दखल घेतली जाईल, आम्ही हिशोब मागत आहोत, ते काय पुरावा मागतात,तुरंगात जाण्याची तयारी ठेवा, असेही संजय राऊत म्हणाले. 


चोराला चोर म्हणणारच, दादा भुसेंवर हल्लाबोल


दुसरीकडे, मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी गिरणा साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून 178 कोटी रुपये गोळा केले, त्याचा हिशेब द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केल्यानंतर भुसे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी आज पार पडली. आजच्या सुनावणीत कोर्टाने दोन्ही नेत्यांना तडजोड करु शकता का? असं विचारलं. त्यावर संजय राऊत यांनी नाही म्हणून सांगितलं. आता याप्रकरणी  3 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी संजय राऊत यांना हजर राहण्याचे आदेश दिले. चोराला चोर म्हणण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. चोराला महात्मा मी म्हणू शकत नाही, तो घटनेचा अपमान होईल. तुम्ही अद्वय हिरेंना तुरुंगात टाकता, मग दादा भुसेंचा 178 कोटींचा घोटाळा असताना तुम्ही त्यांना अटक का करत नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या